संख्यावाचन

संख्यावाचन 1 ते 100
  1. दशमान पध्दतीमध्ये 0 ते 9 अशा अंकांच्या 10 खुणा आहेत. 9 नंतर येणा-या 10 या संख्येत 1 या अंकाची स्थानिक किंमत 10 आहे असे मानले जाते.
  2. त्यामुळे 10 या संख्येचे वाचन "एक दशक" असे करणे अधिक योग्य ठरेल. मात्र आपण व्यवहारात या संख्येचे वाचन "दहा" असेच करतो.
  3. याप्रमाणेच 10 च्या पुढील संख्यांचे वाचन करता येईल -
    1. 11 = एक दशक, एक एकक
    2. 12 =  एक दशक, दोन एकक
    3. 35  = तीन दशक, पाच एकक
    4. 97 = नउ दशक, सात एकक
  4. मात्र व्यवहारात 1 ते 100 या संख्यांसाठी वेगवेगळी नावे आहेत. उदा. 11  = अकरा, 12  = बारा, 35  = पस्तीस, 97  = सत्याण्णव.
  5. ही व्यावहारिक नावे म्हणत असतानाच या संख्यांची किंमत दर्शविणारी नावेही लक्षात ठेवावित.
संख्यावाचन 1 ते 1000
  1. 99 ही दोन अंकी सर्वात मोठी संख्या आहे.
  2. 99 = 9 दशक, 9 एकक.
  3. यानंतरची संख्या 100. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत 100 किंवा "1 शतक" एवढी आहे.
  4. शतकी संख्यांचे वाचन करताना शतकस्थानच्या अंकापुढे "शे" जोडून दशक-एकक स्थानच्या अंकांनी मिळून बनलेली संख्या त्यापुढे वाचतात.

No comments:

Post a Comment