बेरीज म्हणजे मिळविणे किंवा समाविष्ट करणे.
आपण क्रमाने संख्या म्हणत असताना प्रत्येक संख्येमध्ये एक मिळवूनच पुढे जात असतो, म्हणजे बेरीजच करीत असतो.
एकापेक्षा मोठी संख्या मिळविताना तेवढे अंक पुढे मोजत जाण्याची क्रिया आपण करतो, कदाचित त्यासाठी आपल्याला बोटे मोजावी लागतात.
'बोटे मोजून बेरीज करणे' नैसर्गिक असले, तरी गणितातील प्रगतीच्या दृष्टीने मारक आहे. त्यामुळे बोटे मोजून बेरीज करण्याची सवय जेवढया लवकर सोडता येईल तेव्हढया लवकर सोडविली पाहिजे.
बोटे मोजून बेरीज करण्याला पर्याय म्हणजे 'एक अंकी बेरजेचा तक्ता' पाठ असणे. तो पाठ करण्याआधी 'एक अंकी बेरीज' म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. शून्य ते नऊ या संख्या एक-अंकी संख्या आहेत. या एक-अंकी संख्यांच्या बेरजांच्या सर्व शक्यता समाविष्ट असणारा तक्ता म्हणजे एक-अंकी बेरजेचा तक्ता.
No comments:
Post a Comment